मुंबई

वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या सदिच्छाची हत्या केल्याची आरोपीने दिली कबुली ; पण वडील म्हणतात...

प्रतिनिधी

१४ महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पालघरची सदिच्छा साने बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज या प्रकारांत आरोपी असलेल्या मितू सिंहने तिची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचेही त्याने कबूल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वांद्रे बँड स्टँडजवळ समुद्रात सदिच्छा सेनेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात आरोपी मितू सिंहने आपला जबाब अनेकदा बदलला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक वाढत गेला. अखेर त्याने आपणच तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासून पोलिसांनी नौदलाच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु कलेची होती. मात्र, काहीही हाती न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा पोलीस दुसऱ्या यंत्रणांच्या साहाय्याने शोध घेणार असल्याचे सांगितले आहे.

सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी यावर म्हंटले आहे की, "सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत आहेत." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंहने माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. 'या प्रकरणात योग्य तपासणी करुन कारवाई केली जावी,' तिच्या वडिलांनी केली आहे.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

Lok Sabha Elections 2024: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मूसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात? व्हिडिओ व्हायरल