मुंबई

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मिशन फर्स्ट क्लास

दहावीच्या निकालात प्रत्येक वर्षी वाढ होत असून यावर्षी दहावीचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे.

प्रतिनिधी

यंदा मुंबई महापालिकेच्या १०वीतील विद्यार्थ्यांचा निकाल ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दर्जेदार शिक्षण व अनेक सोईसुविधा यामुळे ९७ टक्के निकालाचे उद्दिष्ट सफल झाले आहे. आता ९७ टक्क्यांपर्यंत न थांबता १०० टक्के निकालाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अभ्यास पद्धती, जादा क्लास असे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर अनेक सोईसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची संख्या वाढत असून, दहावीच्या निकालात प्रत्येक वर्षी वाढ होत असून यावर्षी दहावीचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या राज्य आणि मुंबईच्या सरासरी ९६.९४ टक्के निकालापेक्षा पालिकेचा दहावीचा निकाल जास्त लागला आहे. गेल्या दोन वर्षांत ही सुधारणा झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शिवाय पालिकेचा विद्यार्थी स्पर्धेत टिकावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केंब्रीजसह ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी