मुंबई

Mumbai : भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने आमदार संतप्त

वानखेडे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने विधान परिषदेत आमदार संतप्त झाले.

Swapnil S

मुंबई : वानखेडे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने विधान परिषदेत आमदार संतप्त झाले. पोलीस आणि अधिकाऱ्यांना तिकीट मिळते, मग आमदारांना का नाही. पैसे घ्या, पण तिकीट मिळायलाच हवे, अशी मागणी करीत आमदारांनी विधान परिषदेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका केली.

भारत-इंग्लंड सामान्याची उपांत्य फेरीसाठीच्या लढतीची तिकीट न मिळाल्याची तक्रार विधान परिषदेत सभापतींकडे करण्यात आली. सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपस्थित करताना भारत-इंग्लंड सामना मुंबईत होत आहे, याचा अभिमान आहे. मात्र पूर्वी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या काळात सदस्यांना पास दिले जात. आता मोठ्या कंपन्यांचे लोक स्टेडियममध्ये बसतात. पण आमदारांना पास मिळत नाहीत. सनदी अधिकारी आणि पोलिसांना तिकीट मिळतात. पण आमदारांना पास मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामना असताना आम्ही सदस्यांना तिकीट देतो तसेच येथेही आमदारांसाठी पासची व्यवस्था व्हायला हवी. अधिवेशन सुरू असताना सदस्यांना सामना पाहण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

परतीचा प्रवासही मुंगीच्या गतीने; मुंबई-गोवा मार्गावर वाहतूककोंडी

जरांगे माघारीचे नाट्य, पडद्याआडच्या कुरापती....!