ऑरेंज गेट- मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज टीबीएमचे अनावरण छायाचित्र : MMRDA
मुंबई

ऑरेंज गेट- मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज टीबीएमचे अनावरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह कॉरिडोर महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. बुधवार, ३ डिसेंबरला टनेल बोरिंग मशीन (डीबीएम) चे औपचारिक अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह कॉरिडोर महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. बुधवार, ३ डिसेंबरला टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चे औपचारिक अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या ९.९६ किमीच्या शहरी रस्ता टनेल प्रकल्पात ७ किमीचा भूगर्भातील टनेल समाविष्ट आहे. सध्या प्रकल्पाची भौतिक प्रगती १४ टक्के झाली असून पूर्णत्वासाठी ५४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्लरी शिल्ड टीबीएम वापरणार आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात वापरलेल्या तंत्रज्ञानाचे हे यशस्वी उदाहरण असून या टीबीएमची स्थानिक पातळीवर पुनर्बांधणी करण्यात आली आहे. ही टीबीएम मशीन मुंबईतील किनारी भागातील कठीण भूगर्भरचना आणि उच्च पाण्याच्या दाबाच्या क्षेत्रातून सुरक्षितरीत्या मार्गक्रमण करू शकते. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “हा टनेल भारतातला पहिलाच असेल, जो दाट लोकवस्तीखाली, तसेच सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे आणि मेट्रो-३ (अक्वा लाइन) च्या खाली, तब्बल ५० मीटर खोलीवरून जाणार आहे.”

कट्टरहेडचा व्यास : १२.१९ मीटर

लांबी : ८२ मीटर

वजन : अंदाजे २४०० टन

दोन मार्गिका, अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे वेळ, इंधन, पैशाची बचत

या टनेलमध्ये प्रत्येकी ३.२ मीटर रुंदीच्या दोन वाहतूक लेन्स आणि २.५ मीटरची इमर्जन्सी लेन असेल. प्रत्येक ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज, आधुनिक व्हेंटिलेशन, अग्निरोधक बांधकाम, अत्याधुनिक रोषणाई आणि इन्टेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) बसवली जाणार आहे. हा टनेल कोस्टल रोड आणि आतल सेतूशी जोडला जाईल, ज्यामुळे पूर्व–पश्चिम वाहतूक अधिक सुलभ होईल. दरम्यान, हा प्रकल्प मुंबईतील पूर्व–पश्चिम जोडणी बदलून टाकेल. प्रवासाचा वेळ १५–२० मिनिटांनी कमी होईल, इंधनाची बचत तसेच वायू व ध्वनी प्रदूषणात घट होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

नव्या वर्षात अमृता खानविलकरची नवी इनिंग! आता रंगभूमीवर पदार्पण; म्हणाली - 'या' नाटकासाठी ‘हो’ म्हटलं, कारण...

Navi Mumbai : एनएमएमटी बस शेल्टर घोटाळा; जाहिरातीसाठीच शेल्टर ; शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका