Mumbai : ‘बीकेसी’तील भूखंड लिलावातून MMRDA ला मिळणार ९,२८५ कोटी  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : ‘बीकेसी’तील भूखंड लिलावातून MMRDA ला मिळणार ९,२८५ कोटी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील नऊ मोक्याच्या व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचा लिलाव करून सुमारे ९,२८४.८८ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील नऊ मोक्याच्या व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचा लिलाव करून सुमारे ९,२८४.८८ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे.

बीकेसीमधील 'जी' ब्लॉक येथे स्थित हे भूखंड ८० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले जाणार असून त्यासाठी ई-निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निधीचा विनियोग मेट्रो मार्गिका, रस्ते जाळे आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.

या लिलावात पाच व्यावसायिक भूखंडांची एकत्रित राखीव किंमत ६,६२०.६३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ७,४१५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा सी-७५ हा भूखंड सर्वाधिक किमतीचा असून त्याची राखीव किंमत १,४३२.५५ कोटी रुपये आहे. दुसरीकडे, चार निवासी भूखंडांची राखीव किंमत सुमारे २,६६४.२५ कोटी रुपये आहे. व्यावसायिक भूखंडांसाठी प्रति चौरस मीटर ४.८२ लाख रुपये, तर निवासी भूखंडांसाठी ३.५२ लाख रुपये राखीव दर निश्चित करण्यात आला आहे. जमीन विक्रीतून निधी उभारणे हे प्राधिकरणाच्या व्यापक धोरणाचा भाग असून यामुळे शहरी वाहतूक प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

‘बीकेसी’त कार्यालय व घरांना मोठी मागणी

मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या बीकेसीमध्ये सध्या व्यावसायिक कार्यालये आणि उच्च दर्जाच्या निवासी घरांची मोठी मागणी आहे. त्यामुळे या लिलावात गुंतवणूकदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे रिअल इस्टेट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO