(Photo-X/@mieknathshinde)
मुंबई

MMRDAचा शिलकीचा अर्थसंकल्प; ४८,०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर, विकास प्रकल्पांसाठी ८७ टक्के तरतूद

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी २००२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४८,०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. २०१७-१८ नंतर प्रथमच हा अर्थसंकल्प शिलकीचा सादर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी २००२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४८,०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. २०१७-१८ नंतर प्रथमच हा अर्थसंकल्प शिलकीचा सादर करण्यात आला आहे. तर १७ लाखांचा अधिशेष साध्य करण्यास प्राधिकरणास यश आले आहे.

४८,०७२.५७ कोटींचा अपेक्षित आर्थिक प्राप्ती आणि ४८,०७२.४० कोटींच्या प्रस्तावित खर्चामुळे अर्थसंकल्पात १७ लाखांचा अधिशेष दर्शविण्यात आला आहे. जमिनीच्या वापरातून संरचित निधी उभारणी, अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (यूटीएफ) बळकटीकरण, प्रकल्पांशी संबंधित महसुलात झालेली सुधारणा, तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि संस्थात्मक वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून उभारलेले भांडवल यामुळे हा अधिशेष साध्य झाला आहे.

विकास प्रकल्प व योजनांसाठी एकूण खर्चाच्या ८७.४२ टक्के इतकी म्हणजेच ४२,०२६.१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४८,०७२.५७ कोटींची प्रस्तावित अर्थसंकल्पीय तरतूद २०२५-२६ साठीच्या ३०,३१६.१८ कोटींच्या सुधारित अंदाजापेक्षा ५८.५७ टक्के अधिक आहे. तसेच ४८,०७२.४० कोटींचा प्रस्तावित खर्च मागील वर्षातील ३१,३१३.१३ कोटींच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत ५३.५२ टक्के जास्त आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ ते २०२६-२७ या कालावधीत प्राधिकरणाला बहुतांश वर्षे तुटीचा सामना करावा लागला. या काळात काही वर्षांत तूट खूपच मोठी होती. मात्र, सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्राधिकरणाने आर्थिक समतोल साधत ०.१७ कोटी इतका किरकोळ अधिशेष नोंदवला.

२०२६-२७ च्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रादेशिक पातळीवर समन्वयित परिवर्तन धोरणाला वेग देण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था, आर्थिक विकेंद्रीकरण, जल सुरक्षा, हवामान बदलांशी सामना करण्याची क्षमता तसेच गृहनिर्माणातील सुधारणा या घटकांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे.

महसूल संरचना

४८,०७२.५७ कोटींच्या अपेक्षित आर्थिक उत्पन्नात पुढील घटकांचा समावेश :

  • जमीन विक्री - ११,१७७.९५ कोटी

  • अर्बन ट्रान्सपोर्ट फंड - ६,३६८.४२ कोटी

  • कर्जउभारणी - २३,७११.१६ कोटी

  • राज्य अधिनस्थ कर्जे - ३,५२०.०० कोटी

  • प्रकल्प संचालनातून मिळणारा महसूल - ४४१.७१ कोटी

  • शासकीय अनुदाने आणि टीडीआर - १,१८९.१४ कोटी

  • भूभाडे आणि व्याज उत्पन्न - १,६६४.१९ कोटी

महान नेत्यांच्या स्मारकांची उभारणी

  • इंदू मिल येथील भारतरत्न

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य स्माक - ४००.०० कोटी

  • स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक (भाग १ व २), महापौर निवास, मुंबई - १७१.५० कोटी

  • एकूण तरतूद - ५७१.५० कोटी

हरित एमएमआर : हवामान बदल सक्षम भविष्य

मुख्य भर :

  • ब्ल्यू-ग्रीन पायाभूत सुविधा

  • एकात्मिक कचरा व्यवस्थापन

  • नवीकरणीय ऊर्जेचा समावेश

  • शाश्वत दळणवळण

  • मुंबई क्लायमेट वीक

  • एकूण तरतूद - २५०.०० कोटी

झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण

  • माता रमाबाई आंबेडकर नगर एसआरए - ५५१.०० कोटी

  • पुनर्वसन व पुनर्स्थापना - १५०.०० कोटी

  • परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे - ३०.३३ कोटी

  • एकूण - ७३१.३३ कोटी

भुयारी दळणवळण मार्ग

शहराच्या मध्यवर्ती भागावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि शहरांतर्गत प्रवास अधिक जलद करण्यासाठी एमएमआरडीएकडून उच्च क्षमतेच्या भुयारी दळणवळण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे.

  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोड भुयारी मार्ग - १,२५०.००

  • गायमुख ते फाऊंटन हॉटेल भुयारी मार्ग - ७५.००

  • ठाणे ते बोरिवली चार पदरी भुयारी मार्ग - ३,०२९.५१

  • मुंबई इंटिग्रेटेड टनेल - (बीडब्ल्यूएसएल-बीकेसी-एचएसआर-टी२ जोडणी) - १,१८९.००

  • एकूण - ५,५४३.५१

  • तरतूद (कोटींमध्ये)

मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टि- रिग रोड नेटवर्क

  • अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी - ६०३.००

  • आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग - ८८०.१२

  • ठाणे कोस्टल रोड (बाळकुम-गायमुख) - १,०२५.७७

  • फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग - ७५.००

  • कल्याण रिंग रोड - ६००.००

  • वरळी-शिवडी उन्नत कॉरिडॉर - ९३६.०७

  • विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प - २,३६२.२०

  • मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग कॉरिडॉर (उत्तन-विरार सी लिंक) - २,०००.००

  • मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग : साकेत ते आमणे जोड रस्ता - ५००.००

  • पूर्व मुक्त मार्ग विस्तार (छेडा नगर, घाटकोपर ते ठाणे) - १,१०६.७५

  • कल्याण-मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता) - २००.००

  • गायमुख ते पायगाव खाडी पूल - ६८२.१०

  • कसारवडवली, ठाणे ते खारबाव खाडी पूल - ८४०.७१

  • कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडी पूल - १०५.५१

  • राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका उन्नत रस्ता - ९००.००

  • एकूण - ₹१२,८१६.५३

ग्रोथ हबच्या माध्यमातून एमएमआरला नवा आकार देणे (मुंबई ३.०)

  • केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) नवी वसाहत - ४,०००.००

  • रायगड पेण विकास केंद्र - ५००.००

  • खारबाव एकात्मिक बिझनेस पार्क - १००.००

  • एकूण - ४,६००.००

माहिती तंत्रज्ञान

  • एकात्मिक डिजिटल डिलिव्हरी कार्यक्रम (आयडीडीपी), प्रादेशिक माहिती प्रणाली (आरआयएस), ईआरपी प्रणाली आणि इतर उपक्रम

  • एकूण तरतूद - २३५.३४ कोटी रुपये

जलस्रोत आणि प्रादेशिक शाश्वतता

  • सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजना - २६७.०० कोटी

  • देहरजी मध्यम प्रकल्प - २४७.०७ कोटी

  • पोशीर धरण व अन्य प्रकल्प - ४६६.८० कोटी

  • एकूण तरतूद - ९८०.८७ कोटी

  • या प्रकल्पांच्या माध्यमातून मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर आणि लगतच्या परिसरात दीर्घकालीन जलसुरक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

२०१७-१८ नंतर प्रथमच सादर झालेला एमएमआरडीएचा अधिशेष अर्थसंकल्प हा संस्थात्मक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणि पायाभूत सुविधांवर आधारित दीर्घकालीन विकासदृष्टी प्रतिबिंबित होते. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाला आधुनिक, गुंतवणुकीसाठी सज्ज आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करू शकणारा शहरी प्रदेश म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एमएमआर एकात्मिक मेट्रो नेटवर्कच्या प्रमुख मार्गिका

  • मेट्रो २अ मार्गिका (डी. एन. नगर ते दहिसर) - ४५.१९ कोटी

  • मेट्रो २ब मार्गिका (डी. एन. नगर ते मंडाळे) - १,२२४.६० कोटी

  • मेट्रो ४ मार्गिका (वडाळा-कसारवडवली) - ३,६३०.७१ कोटी

  • मेट्रो ४अ मार्गिका (कसारवडवली-गायमुख) - १७६.५४ कोटी

  • मेट्रो ५ मार्गिका (ठाणे-भिवंडी-कल्याण) - १,३०९.३० कोटी

  • मेट्रो ५अ मार्गिका (विस्तार) (दुर्गाडी ते उल्हासनगर) - १८३.३५ कोटी

  • मेट्रो ६ मार्गिका (स्वामी समर्थ नगर-कांजुरमार्ग) - २,४०७.७८ कोटी

  • मेट्रो ७ मार्गिका (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)) - २४.०५ कोटी

  • मेट्रो ९ आणि ७अ मार्गिका (दहिसर-मीरा-भाईंदर / अंधेरी-सीएसटी विमानतळ) - १,१५१.८७ कोटी

  • मेट्रो १० मार्गिका (गायमुख ते मीरा रोड) - १००.०० कोटी

  • मेट्रो १२ मार्गिका (कल्याण ते तळोजा) - १,०५४.५४ कोटी

  • मेट्रो १३ मार्गिका (घोडबंदर ते विरार) - २००.०० कोटी

  • मेट्रो १४ मार्गिका (कांजुरमार्ग ते बदलापूर) - ५००.०० कोटी

  • मंडाळे मेट्रो भवन - ४०३.३१ कोटी

  • मालवणी, मालाड व मंडाळे येथील कर्मचारी निवास - २४८.९१ कोटी

  • कल्याण शिळफाटा जंक्शन ते राजनोली चौक, भिवंडी उड्डाणपूल - १५०.०० कोटी

  • ट्रान्स्पोर्ट स्टॅक: डिजिटल मोबिलिटी प्लॅटफॉर्म - २५.०० कोटी

  • मेट्रो नियोजन व मल्टि-मॉडेल एकत्रीकरण डिझाइन - ९१९.६३ कोटी

  • मेट्रो ७ उन्नत पादचारी पूल (एफओबी) - ८४.१० कोटी

  • एकूण - १३,८३८.८८ कोटी

अर्थसंकल्पातील ८७ टक्के तरतूद थेट प्रकल्पांसाठी करण्यात आल्याने प्राधान्यक्रम स्पष्ट असलेला आणि जबाबदारीचे भान असलेला दिसून येतो. ग्रोथ हब संकल्पनेअंतर्गत एमएमआरडीएने नियोजित प्रादेशिक विस्ताराचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष
हा अर्थसंकल्प वित्तीय शिस्त, संतुलित भांडवल उभारणी आणि सातत्यपूर्ण पायाभूत सुविधा अंमलबजावणीचा परिणाम आहे. एकीकडे वाहतूक जोडणी विस्तारत असताना, मुंबई ३.०च्या माध्यमातून विकासाचे विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक शाश्वततेचे बळकटीकरणही करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक ताणाच्या टप्प्यातून आर्थिक स्थैर्याकडे संक्रमण होत असून, विकासाचा वेगही व्यापक पातळीवर कायम राखण्यात आला आहे.
डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए आयुक्त

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार