मुंबई

MNS : "आदित्य ठाकरेंची चौकशी करा मग..."; या मनसे नेत्याने केला हल्लाबोल

प्रतिनिधी

आज सकाळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला झाला. ४ जणांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टंपने हल्ला केला. मात्र, यावरून आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी तर थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करा, सर्व सत्य बाहेर येईल" अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर अमेय खोपकर म्हणाले की, "माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताबडतोब ताब्यात घ्यावे आणि चौकशी करावी." अशी टीका केली. ते म्हणाले की, "संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने हे सारखे पाठीमागून हल्ले करतात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा. जर काही तथ्य निघाले तर त्यांना तातडीने अटक करा. संदीप देशपांडे हा काही गप्प बसणारा माणूस नसून मुंबई पोलीस आणि प्रशासनाने त्यांना योग्य ती सुरक्षा द्यावी." अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, "आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. मर्द असाल तर पुढे या, पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. असे हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?" असा इशारादेखील अमेय खोपकर यांनी दिला आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया