मुंबई

Raj Thackeray : मनसेच्या 'या' नेत्याने दिला राजीनामा; बीएमसी निवडणुकीआधीच राज ठाकरेंना झटका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी मनसेच्या एका बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा झटका बसला आहे

प्रतिनिधी

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (BMC Election) जोरदार तयारी सुरु केली आहे. अशामध्ये पक्षातील एका बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने राज ठाकरेंची चिंता वाढली आहे. मनसेचे 'मसल मॅन' म्हणून ओळख असलेले मनीष धुरी यांनी पक्षातील सर्वच पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मनीष धुरी यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते मनसेच्या अंधेरी विभागाचे अध्यक्ष होते. मनीष धुरी हे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला आहे. मात्र, अचानकपणे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्र लिहून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत