मुंबई

मोहम्मद अली रोड, इब्राहिम मर्चंट रोड अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, स्टाॅल दुकानांवर हातोडा, पादचारी प्रथम अभियानांतर्गत बी वॉर्डची कारवाई

पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ मोकळे करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ मोकळे करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली इब्राहिम मर्चंट रोड आणि मोहम्मद अली रोड परिसरात दोन दिवस कारवाई करून अनधिकृत दुकाने, स्टॉल, सिमेंटचे ओटले, दुकानांचे प्रोजेक्शन, ताडपत्रीचे शेड तसेच इतर साहित्य हटवण्यात आले.

कारवाई सुरूच राहणार

मुंबई महापालिकेच्या परिमंडळ १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली पादचारी प्रथम अभियान हाती घेण्यात आले आहे. पादचारी प्रथम अभियानांतर्गत बी वार्डात अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला आहे.

हातगाडी, प्रोजेक्शन, ताडपत्रीवर कारवाई

मुंबईतील फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून सुरक्षित व सुलभ फुटपाथ मिळावे यासाठी पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत आहे. पालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ मोहीम हाती घेण्यात आले आहे. ३० सप्टेंबर रोजी इब्राहिम मर्चंट रोड येथे करण्यात आलेल्या कारवाईत १२ हातगाडी/फेरीवाले आणि दोन दुकाने अथवा स्टॉल हटवण्यात आले तसेच रस्ते व पदपथ अडवणारे दुकानांचे अनधिकृत प्रोजेक्शन, ताडपत्रीचे शेड व इतर अनधिकृत साहित्य हटवण्यात आले. तर १ ऑक्टोबरला मोहम्मद अली रोड येथेही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.

अडथळा केला दूर

या कारवाईत एक दुकान/स्टॉल, चार सिमेंटचे ओटले आणि दोन इतर अनधिकृत संरचना हटवण्यात आल्या. याशिवाय दुकानांबाहेरील अनधिकृत प्रोजेक्शन, ताडपत्रीचे शेड आणि रस्त्यावर ठेवलेले इतर साहित्यही हटवण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

निर्भेळ यशाचे लक्ष्य; गोलंदाजांवर पुन्हा लक्ष! भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना