मुंबई

Molesting Korean woman YouTuber: कोरियन युट्यूबर महिलेची छेड काढणाऱ्या २ तरुणांना अटक; खार पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी

मुंबईतील खार भागामध्ये एक दक्षिण कोरियामधून आलेली युट्यूबर तरुणी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. (Molesting Korean woman YouTuber) यावेळी २ तरुणांनी तिचा विनयभंग केला. हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला.

त्यानंतर खार पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची दखल घेऊन कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या संदर्भात गुरुवारी पहाटे खार पोलिसांनी १९ वर्षीय चांद मोहम्मद आणि २० वर्षीय मोहम्मद नकीब अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही २९ नोव्हेंबरला घडली आहे. दक्षिण कोरियातुन आलेली ही तरुणी मुंबई फिरण्यासाठी खार परिसरामध्ये आली होती. लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना या २ तरुणांपैकी एका तरुणाने तिला स्वतःकडे खेचून जबरदस्ती करण्याचा आणि तिच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरुणीने त्याला दूर केले. हे सर्व प्रकरण तिच्या एका फॉलोअरने ट्विट केले आणि मुंबई पोलिसांना टॅग केले. यानंतर खार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. परंतु, यानंतर पुन्हा एकदा विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासर्व प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध केला आहे.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर