मुंबई

मॉरिसचा अंगरक्षक मिश्रावर हत्येचा गुन्हा

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटप्रकरणी मिश्रा हा संशयित असल्याचा आरोप पोलीस करत आहेत.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिस याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मिश्रा याची १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

पोलिसांनी सांगितले की, या गुन्ह्यात मिश्रा याचा सहभाग असल्याने त्याला अटक केली आहे. घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल मिश्रा यांच्या मालकीचे होते. हे पिस्तूल बाळगण्यामागे काय हेतू होते, याचा तपास केला जात आहे. हेच पिस्तूल नोरोन्हा याने आत्महत्येसाठी वापरले होते, हे पोलिसांनी नमूद केले आहे. मॉरिसकडे पिस्तूल ठेवण्याचा परवाना होता का, याची मिश्रा यांनी पडताळणी केली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मिश्रा यांचे वकील शंभू झा म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटप्रकरणी मिश्रा हा संशयित असल्याचा आरोप पोलीस करत आहेत. त्याच्याविरोधात कलम ३०२ लागू होऊ शकत नाही. मात्र, पोलीस या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्याने पिस्तुल उत्तर प्रदेशातून मुंबईत आणले होते. मिश्रा हा पोलिसांना तपासात सहकार्य करत आहे. तरीही पोलिसांनी त्याची कोठडी घेतली आहे, असे ते म्हणाले.

पोलिसांनी दावा केला की, मिश्रा हा चौकशीत सहकार्य करत नसून उत्तरे टाळत आहे. मिश्रा याने हे पिस्तुल कधी मुंबईत आणले, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याने मुंबई पोलिसांकडून परवानगी घेतली होती का? त्या मुंबईत यापूर्वी पिस्तुल वापरले होते का? याचा तपास केला जात आहे. मॉरिस याला पिस्तुल देताना मिश्रा याला काही आर्थिक लाभ झाला होता का? त्याची गुन्हेगाराची काही पार्श्वभूमी होती का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

मिश्रा यांच्या वकिलाने सांगितले की, मिश्रा याचा गुन्हा किरकोळ आहे. तो गुन्हेगार नाही. त्याच्याकडे पिस्तुल वापराचा संपूर्ण देशाचा परवाना आहे. मिश्रा हा नोकर होता. तो कायमच बंदुक सुरक्षितपणे ठेवत होता. या घटनेच्या वेळी मॉरिसने मिश्रा याच्या परवानगीशिवाय वापरली, असा दावा त्याच्या वकिलाने केला. सुनावणीनंतर कोर्टातून बाहेर पडताना मिश्रा म्हणाला की, माझ्यावर अन्याय झाला आहे. मला फसवले गेले आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव