रिलायन्समधील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुकेश अंबानी यांच्याकडून नव्या पिढीकडे सूत्रे सुपूर्द 
मुंबई

रिलायन्समधील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुकेश अंबानी यांच्याकडून नव्या पिढीकडे सूत्रे सुपूर्द

रिलायन्सच्या तेल, दूरसंचार, किरकोळ विक्री क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीजमधील दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याची प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आली आहे, असे अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी जाहीर केले. कंपनीमधील नेतृत्वबदल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

Swapnil S

मुंबई : रिलायन्सच्या तेल, दूरसंचार, किरकोळ विक्री क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीजमधील दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याची प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आली आहे, असे अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी जाहीर केले. कंपनीमधील नेतृत्वबदल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

  • ईशा अंबानी : किरकोळ विक्री आणि ग्राहक उत्पादने व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.

  • आकाश अंबानी : माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व्यवसायाची धोरणे सांभाळत आहेत.

  • अनंत अंबानी : पारंपरिक ऊर्जा, तेल ते रसायन आणि नवीन ऊर्जा क्षेत्राची ध्येयधोरणे निश्चित करत आहेत.

५०० तरुण नेत्यांची फळी सज्ज

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ते स्वतः मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील, परंतु त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी ३० आणि ४० वयोगटातील ५०० तरुण नेत्यांची फळी विविध व्यवसायांमध्ये तयार करण्यात आली आहे. हे तरुण नेते आपल्या क्षेत्रातील उच्च दर्जाचे ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण घेऊन आले आहेत. रिलायन्सची संस्थात्मक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि कामगिरीचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी ज्येष्ठ अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

तीन मुले आणि जबाबदाऱ्यांचे वाटप

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की, त्यांची तिन्ही मुले आता समूहातील प्रमुख व्यवसायांचे नेतृत्व करत असून ती कंपनीला विकासाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जातील.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग