विरोधानंतरही मुलुंड गोल्फ कोर्स प्रकल्पाला गती; 'प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया' बरोबर चर्चा सुरू 
मुंबई

Mumbai : विरोधानंतरही मुलुंड गोल्फ कोर्स प्रकल्पाला गती; 'प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया' बरोबर चर्चा सुरू

मुलुंड येथील डंम्पिंग ग्राऊंड मोकळे झाल्यावर या ठिकाणी गोल्फ कोर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी 'प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया'ची निवड केली आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, आमदार मिहीर कोटेचा यांनी गोल्फकोर्स संदर्भात पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी कमलदीप सिंग यांची भेट घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंड येथील डंम्पिंग ग्राऊंड मोकळे झाल्यावर या ठिकाणी गोल्फ कोर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी 'प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया'ची निवड केली आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, आमदार मिहीर कोटेचा यांनी गोल्फकोर्स संदर्भात पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी कमलदीप सिंग यांची भेट घेतली आहे.

मुंबई महापालिकेकडून मुलुंडमध्ये बंद करण्यात आलेल्या डंम्पिंग ग्राऊंडची जागेवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून भूखंड मोकळा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात मोकळ्या भूखंडावर गोल्फ कोर्स उभारण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. त्यानुसार महापालिकेने गोल्फ कोर्स उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याची जबाबदारी पीजीटीआयवर सोपवली आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी कमलदीप सिंग यांची नुकतीच भेट घेतली. गोल्फ आणि इतर ऑलिम्पिक खेळ तळागाळातील तरुण पिढीपर्यंत कसा पोहोचवता येतील यावर चर्चा झाली तसेच त्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे, यावरही चर्चा करण्यात आला.

गोल्फचा प्रसार करणार

मुंबई आणि विशेषतः मुलुंडमध्ये ऑलिम्पिक खेळ आणि गोल्फचा तळागाळात प्रसार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यावर आमचा भर आहे, असे मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

त्याचा सामान्यांना काहीच उपयोग नाही

मुलुंड येथे होणारे गोल्फ प्रकल्प हे सर्व सामान्य नागरिकांना परवडणार नाही. गोल्फ कोर्सवर येणारे नागरिक हे उच्चभ्रू असणार असून यांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आम्ही मुलुंडकर या प्रकल्पाला विरोध करणार आहोत, असा इशारा ठाकरे सेनेचे विधानसभा संघटक अँड. सागर देवरे यांनी दिला आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल