Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक (Photo-X)
मुंबई

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथके तयार केली.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : माझगावचा मोरया गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीवर रविवारी (दि. २३) अंडी फेकल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली. दानिश शेर खान असे त्याचे नाव असून या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या ३६ तासांत आरोपीला अटक केली.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

२३ ऑगस्ट रोजी गणपती आगमन मिरवणूक सुरू असताना एका इमारतीवरून अज्ञात व्यक्तीने कथितरीत्या अंडी फेकली. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. तसेच, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हा क्रमांक ५२०/२०२६ नोंदवला.

पाच तपास पथके तैनात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथके तयार केली. स्थानिक परिसरासह इतर ठिकाणीही शोधमोहीम राबवण्यात आली. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनेनंतर ३६ तासांच्या आत दानिशला अटक करण्यात आली.

फटाक्यांच्या धुरामुळे त्रास झाल्याचा दावा

पोलिसांच्या तपासानुसार, दानिश हा घरपोच अंडी पुरवण्याचे काम करतो आणि ऑनलाइन ऑर्डर घेतो. घटनेच्या दिवशी अंडी पोहोचवण्यासाठी तो रामभाऊ भोगले मार्गावरील एका इमारतीत गेला होता. त्याचवेळी मिरवणुकीत वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या धुराचा त्याला त्रास झाला आणि संतापून त्याने मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

संतापातून कृत्य केल्याचा आरोप

फटाक्यांच्या धुरामुळे त्रास झाल्याने संतापलेल्या दानिशने मिरवणुकीवर अंडी फेकल्याचे पोलिसांनी म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपास

आग्रीपाडा विभाग आणि भायखळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत, पोलीस निरीक्षक किरण खरात आणि सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन आव्हाड, हनुमान सवसे आणि अशोक नरुटे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण आणि दहशतवादविरोधी कक्षाच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video