Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल

मुंबईकरांची अधिक वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांची प्रतीक्षा आता काही वर्षांनी कमी होणार आहे. मुंबईसाठी मंजूर करण्यात आलेल्या २३८ अतिरिक्त एसी लोकल गाड्यांच्या उत्पादन धोरणात भारतीय रेल्वेने मोठा बदल केला आहे.

Swapnil S

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबईकरांची अधिक वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांची प्रतीक्षा आता काही वर्षांनी कमी होणार आहे. मुंबईसाठी मंजूर करण्यात आलेल्या २३८ अतिरिक्त एसी लोकल गाड्यांच्या उत्पादन धोरणात भारतीय रेल्वेने मोठा बदल केला आहे.

पूर्वीच्या आराखड्यानुसार, तंत्रज्ञान भागीदारांमार्फत टप्प्याटप्प्याने उत्पादन केले जाणार होते. त्यामुळे पहिली गाडी २०३० मध्ये आणि संपूर्ण ताफा २०३४ पर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, सुधारित योजनेनुसार पहिली एसी लोकल २०२७ मध्ये आणि पूर्ण ताफा २०३० पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तीन कारखान्यांमध्ये एकाच वेळी उत्पादनप्रस्तावित प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान भागीदारांकडून होणाऱ्या पुरवठ्याची वाट न पाहता, आता सर्व २३८ एसी गाड्यांचे उत्पादन रेल्वेच्या तीन प्रमुख कारखान्यांमध्ये एकाच वेळी केले जाईल.

इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई रेल कोच फॅक्टरी, कपूरथळा मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली या समांतर उत्पादन धोरणामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्तारासोबतच गाड्यांची उपलब्धता वेगाने वाढवणे शक्य होणार आहे.

एमयूटीपी-३ अंतर्गत १९१ लोकल एमयूटीपी-३ए अंतर्गत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सध्या सुमारे २२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. यामध्ये नवीन कॉरिडोअर, अतिरिक्त रेल्वे मार्ग, १५ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटांची लांबी वाढवणे आणि यार्डचे नूतनीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे.

मेट्रोसारख्या आधुनिक सुविधा आणि सुधारित आसनव्यवस्थाया नवीन एसी लोकल सध्याच्या गाड्यांच्या तुलनेत अधिक अत्याधुनिक आणि मेट्रोसारख्या सुविधांनी युक्त असतील.

प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध असतील. तसेच मेट्रोच्या धर्तीवर डब्यांच्या आत डिजिटल स्क्रीनद्वारे प्रवाशांना माहिती व माहितीपट (इन्फोटेनमेंट) दाखवले जातील.वेगवान प्रवास आणि उच्च गतीनवीन गाड्यांची प्रवेग क्षमता वाढवण्यात आली आहे.

गाड्यांची विद्युत क्षमता ३३ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आली आहे, ज्यामुळे गाडी वेगाने गती पकडू शकेल. एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडण्या-मिटण्यासाठी स्थानकांवर १५ ते २० सेकंद जास्त जातात, हा वेळ या वाढीव वेगामुळे भरून निघेल.

पायाभूत सुविधांसोबत उत्पादनाचा ताळमेळगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी मुंबई उपनगरीय नेटवर्कच्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा आवश्यक आहे. २२,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारले जाणारे नवे मार्ग, लांब फलाट आणि यार्ड नूतनीकरणामुळे गाड्यांची क्षमता वाढेल.या नव्या उत्पादनामुळे पूर्वीच्या योजनेतील विलंबाची समस्या सुटणार आहे.

कुशनच्या सीट्स, २५ टनांचा एसी

सध्याच्या स्टीलच्या कडक बाकांची जागा मऊ, गादीयुक्त (क्यूशन) आसने घेतील, ज्यामुळे विशेषतः हिवाळ्यात आणि लांबच्या प्रवासात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.प्रत्येक डब्यात सध्याच्या १५ टन क्षमतेऐवजी २५ टन क्षमतेच्या दोन एसी यंत्रणा बसवल्या जातील. यामुळे कूलिंग आणि व्हेंटिलेशन अधिक प्रभावी होईल.

संभाव्य वेग :

सध्याच्या लोकल गाड्यांचा वेग १०० ते ११० किमी/तास आहे. नवीन गाड्यांचा कमाल संभाव्य वेग १३० किमी/तास असेल. उच्च वेगाला पाठबळ देण्यासाठी या गाड्यांची पुढील रचना अधिक टोकदार केली जाण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त

न्या. यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा दावा

'डॉमिनोज'च्या ४ दुकानांचे परवाने निलंबित; मुंबईतील तीन तर कराडमधील एका शाखेचा समावेश

'सीजेपी'ला दिल्लीत हॉल मिळेना; भाजपचा दबाव, दीपकेंचा आरोप, बैठक रद्द करण्याची वेळ

सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार; अमित शहांचे विरोधकांना आव्हान, सलग एक दिवस चर्चा करा