मुंबई

Mumbai : धारावीतील सर्वेक्षण प्रक्रियेला लागणार १२ ऑगस्टला पूर्णविराम; व्यावसायिकांनाही प्रकल्पाचा लाभ

Dharavi Redevelopment Project: मालकी नसलेल्या, मात्र धारावीत व्यवसाय करत असलेल्या भाडेकरारधारक (लीजहोल्डर) आणि इतर व्यावसायिक धारकांना...

Swapnil S

मुंबई : धारावीत सध्या सुरू असलेले व्यापक पात्रता सर्वेक्षण १२ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण होणार असून त्यानंतर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पथकांचे दौरे थांबवले जाणार आहेत. तथापि, जे झोपडपट्टीधारक वैध कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाईनवर संपर्क साधतील आणि डीआरपी किंवा एनएमडीपीएल कार्यालयात येतील, त्यांना अद्यापही या सर्वेक्षण प्रक्रियेत सामील होण्याची संधी देण्यात येईल, असे डीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत ८७,००० हून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, एक लाखहून अधिक झोपड्यांना विशिष्ट क्रमांक (युनिक नंबर) देण्यात आले आहेत.

डीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या भागात सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी यापूर्वीच भेट दिली आहे अशा भागात १२ ऑगस्ट २०२५ नंतर घरोघरी सर्वेक्षण होणार नाही. जे रहिवासी या कालावधीत सहभागी झाले नाहीत, त्यांनी स्वेच्छेने शासन योजनेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचे गृहीत धरले जाईल. तथापि, असे रहिवासी मसुदा परिशिष्ट-II जाहीर झाल्यानंतर आपली हरकत नोंदवू शकतात.

डीआरपीच्या सर्वेक्षणाने पूर्ण धारावीत सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही भागांमध्ये थोडीशी अनिश्चितता आहे, जसे की खासगी मालकीच्या जमिनी, कुंभारवाडा आणि कंपाऊंड १३ यांसारख्या ठिकाणी अजून अडथळे आहेत. मात्र, ज्या रहिवाशांनी वैध कागदपत्रांसह हेल्पलाईनवर संपर्क साधला, त्यांचा तपशील सर्वेक्षण यादीत समाविष्ट केला जाईल.

व्यावसायिक धारावीतच करणार व्यवसाय

नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने एक धोरण मान्य केले आहे, ज्याअंतर्गत मालकी नसलेल्या, मात्र धारावीत व्यवसाय करत असलेल्या भाडेकरारधारक (लीजहोल्डर) आणि इतर व्यावसायिक धारकांना पुनर्वसन इमारतींमध्ये १०% राखीव व्यावसायिक जागांमध्ये भाडेकरू म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पात्र तसेच अपात्र व्यावसायिक धारावीतच आपला व्यवसाय सुरू ठेवू शकतील.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास