Mumbai : ८३५ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : ८३५ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस 

हवेतील प्रदूषणात कारणीभूत ठरणाऱ्या ८३५ बांधकाम साईट्सना 'स्टॉप वर्क' नोटीस बजावण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : हवेतील प्रदूषणात कारणीभूत ठरणाऱ्या ८३५ बांधकाम साईट्सना 'स्टॉप वर्क' नोटीस बजावण्यात आली आहे. तर ९७७ बांधकाम साईट्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभागातर्फे तसेच वॉर्ड ऑफिसतर्फे तब्बल ३,०९३ बांधकाम ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली.

मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सुधारण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे.

पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी उपाययोजना! 

पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ दंडात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा मुख्य उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

२,८८५ बांधकाम ठिकाणी डॅशबोर्डवर!

  • ऑटो डीसीआर आणि पालिकेच्या विभागांकडून संकलित माहितीनुसार एकूण बांधकाम स्थळांची संख्या - ३,०९३ 

  • बांधकाम स्थळांवर बसविण्यात आलेल्या सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता निरीक्षण यंत्रांची संख्या - २,९३८

  • केंद्रीय सर्व्हर आणि मॉनिटरिंग डॅशबोर्डशी एकात्मिक (इंटिग्रेट) करण्यात आलेल्या सेन्सरची संख्या - २,८८५

२८ नियम बंधनकारक

बांधकाम ठिकाणी स्प्रिकलर उभारणे, ३५ फुट उंच पडदे लावणे, बांधकाम ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीसाठी सेन्सर्स बसवणे आदी २८ नियम बंधनकारक केले आहेत. मात्र अनेक बांधकाम ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आधी कारणे दाखवा नोटीस नंतर ही सुधारणा न केल्यास स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात येते, असे पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सांगण्यात आले. 

घरगुती गॅस दरवाढ; विरोधकांचा हल्लाबोल, मोदी सरकारला किंमत मोजावी लागेल - शरद पवार

मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन

राजीनामा होत नाही तोवर आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांच्या गच्छन्तीबाबत ‘कॉकरोच’ ठाम, राजकीय पक्षांशी संबंध नाही - अभिजीत दीपके

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात

भारत-अफगाणिस्तान एकमेव कसोटी लढत : मानवची पदार्पणात चमक; भारताचा डाव ५६४ धावांवर घोषित, अफगाणिस्तानची ५ बाद ११३ स्थिती