मुंबई

Mumbai Climate : मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली

प्रतिनिधी

सध्या मुंबईकरांसाठी (Mumbai Climate) एक गंभीर बातमी समोर येत असून मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी खालावली असल्याची माहिती देण्यात येत आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली. यामध्ये असे समोर आले की, सोमवारी मुंबईतली हवेची पातळी अतिशय खाली घसरली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मुंबईमध्ये २५६ एक्यूआय (AQI) इतक्या दूषित हवेची नोंद करण्यात आली. मुंबईपेक्षा नवी मुंबईमधील हवा अधिक प्रदुषित असल्याची माहिती समोर आली. नवी मुंबईत ३३२ एक्यूआय दूषित हवेची नोंद झाली. गाड्यांचा धूर, मुंबई तसेच नवी मुंबईतील कारखान्यांमुळे निघणारे रासायनिक वायू, यामुळे ही गुणवत्ता घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. चेंबूरमध्ये हवेची गुणवत्ता अधिक खालावली आहे. तर, कुलाबा येथे हवेची गुणवत्ताही गंभीर प्रमाणात खालावली. त्यामुळे हवामान विभागाकड़ून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासकरून हवामान विभागाने सांगितले की, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम