मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प  
मुंबई

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

मुंबई महापालिका आणि आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने शहरासाठी स्वतंत्र व अत्याधुनिक हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका आणि आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने शहरासाठी स्वतंत्र व अत्याधुनिक हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ‘मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडव्हान्स्ड सायन्सेस’ (मानस) असे या प्रकल्पाचे नाव असून तो २०२६च्या मध्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईचा एक्यूआय १२५ नोंदवला गेला, जो ‘मध्यम’ श्रेणीत मोडतो.

मुंबईत सध्या २८ सतत वातावरणीय हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांमार्फत सीपीसीबी डॅशबोर्डवर रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते. ही केंद्रे २ किमीच्या परिसरातील एक्यूआय दर्शवतात. मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणारा मानस हा पूर्णपणे स्वतंत्र प्लॅटफॉर्म असेल आणि त्यामध्ये ७५ सेन्सर्स बसवले जाणार आहेत. हे सेन्सर्स हायपरलोकल आणि रिअल-टाइम एक्यूआय डेटा उपलब्ध करून देतील. सहा महिन्यांत या प्रणालीचे प्राथमिक स्वरूप कार्यान्वित होणार असून २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रकल्प नागरिकांसाठी पूर्णपणे खुला होईल.

प्रारंभी महापालिका या ७५ सेन्सर्सद्वारे मिळणारा डेटा विद्यमान केंद्रांच्या डेटाशी तुलना करणार आहे. यामुळे मॉडेलमधील फरक, संभाव्य त्रुटी आणि सुधारणा निश्चित करता येतील. प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी खुला केला जाईल. शहराच्या ‘एअरशेड’-समान प्रदूषण स्रोतांमुळे प्रभावित भौगोलिक क्षेत्र- याचे प्रथम नकाशांकन केले जाईल आणि त्यानुसार ज्या भागांमध्ये जास्त केंद्रित मॉनिटरिंगची गरज आहे, तेथे सेन्सर्स तैनात केले जातील.

प्रथमच एआयचा वापर

या प्रकल्पासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून प्रदूषण स्रोत, त्यांच्या पद्धती आणि त्यावर उपाययोजना सुचवली जाणार आहे. हे सेन्सर्स कमी खर्चिक तसेच खभाल करणे सोपे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष मोहीम

महापालिकेने २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान राबवलेल्या विशेष धूळ निर्मूलन मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा आणि बांधकाम साहित्य हटवण्यात आले. या कालावधीत ५७० मेट्रिक टन कचरा, ९५ मेट्रिक टन वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या वस्तू आणि १८ टन बांधकाम अवशेष गोळा करण्यात आले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारीवर्गाने ६७६ रस्त्यांवर स्वच्छता केली, ज्यामध्ये एकूण १,८८८ किमी परिसर समाविष्ट होता.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

नव्या वर्षात अमृता खानविलकरची नवी इनिंग! आता रंगभूमीवर पदार्पण; म्हणाली - 'या' नाटकासाठी ‘हो’ म्हटलं, कारण...