मुंबई विमानतळावर ३९.८ कोटींचे ड्रग्ज, सोने जप्त; ९ जणांना अटक 
मुंबई

मुंबई विमानतळावर ३९.८ कोटींचे ड्रग्ज, सोने जप्त; ९ जणांना अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध कारवायांमध्ये सुमारे ३९.८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि सोने जप्त केले.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध कारवायांमध्ये सुमारे ३९.८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि सोने जप्त केले. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतील सर्वात मोठ्या जप्तीमध्ये कस्टम्स विभागाच्या 'एअर इंटेलिजन्स युनिट' (एआययू), कस्टम्स झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबरला १२ किलो केटामाइन जप्त केले. याची किंमत अंदाजे ३६ कोटी रुपये आहे.

बँकॉकला थायलंडमधील जाणाऱ्या थाय एअरवेजच्या टीजी ३१८ या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून सुमारे ५ किलो केटामाइन जप्त करण्यात आले. त्यानंतर संबंधित प्रवाशाची चौकशी करण्यात आली. तसेच एका निवासी ठिकाणी छापा टाकून आणखी ७ किलो केटामाइन जप्त करण्यात आले. या कारवाईत ड्रग्ज तस्करी टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दोघांना अटक करण्यात आली.

'एनडीपीएस'तर्गत अटक

अन्य दोन कारवायांमध्ये मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांकडून ६.५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या दोघांना 'एनडीपीएस' कायद्यांतर्गत अटक केली.

१.५७ कोटींचे सोने जप्त

आणखी एका कारवाईत कस्टम्स अधिकाऱ्यांनी मुंबईत आलेल्या पाच प्रवाशांकडून लपवून आणलेले १,४४३ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे १.५७ कोटी आहे. या प्रकरणी चार प्रवाशांना सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरू असून या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ आणि सोन्याची एकूण किंमत सुमारे ३९.८ कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी