मुंबई

मुंबई विमानतळाचा रडार दहिसर येथून गोराईत हलवणार; AAI चा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

Krantee V. Kale

मुंबई : मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

यामुळे दहिसरमधील विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईतील दहिसर परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला ‘एक्स’ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले. राज्य सरकारने या आधीच रडार प्रणालीसाठी गोराई येथे जमीन देण्याचा निर्णय घेतला होता, असे फडणवीस म्हणाले.

परवडणारी घरे बांधणार

गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी जाहीर केले होते की, दहिसर येथील एएआयचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार गोराई येथे हलवण्यात येणार आहे. त्यामुळे दहिसरमधील शेकडो एकर जमीन परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध होणार आहे. हा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र सरकार तसेच इतर संबंधित घटकांमधील बैठकीनंतर घेण्यात आला.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये