Mumbai : ‘जलसा’ बॉम्बने उडविण्याची धमकी ठरली अफवा; महापालिका कार्यालयासह, पीएनबीच्या शाखाही लक्ष्य 
मुंबई

Mumbai : ‘जलसा’ बॉम्बने उडविण्याची धमकी ठरली अफवा; महापालिका कार्यालयासह, पीएनबीच्या शाखाही लक्ष्य

मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला, मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) काही शाखांनाही बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. ही धमकी अफवा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त रागसुधा यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आला. पोलिसांनी संबंधित ठिकाणी तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी महापालिका कार्यालयाला धमकीचा ई-मेल आला. त्यानुसार पीएनबीच्या मरीन ड्राइव्ह आणि झवेरी बाजार येथील दोन शाखांमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर कारबॉम्बद्वारे हल्ला करण्याचीही धमकी देण्यात आली होती.

याशिवाय मुंबई विमानतळ, महालक्ष्मी स्टेडियम, न्यायालये आणि महापौर कार्यालयालाही संभाव्य लक्ष्य म्हणून नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या धमकीच्या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक संघटनेचे नावही वापरण्यात आल्याचा संशय आहे. धमकी मिळताच संबंधित यंत्रणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ई-मेलमधील उल्लेखानुसार सर्व ठिकाणी सुरक्षा तपासणी करण्यात आली. मात्र,कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दरम्यान, या धमकीसंदर्भात करण्यात आलेल्या फोन कॉलसाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्हीपीएन सेवेमुळे कॉलचा मूळ स्रोत शोधणे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे तपास यंत्रणांसमोर आव्हान ठरत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंदवून तपास सुरू केला आहे. धमकीचा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, कॉलचे तांत्रिक तपशील काय आहेत आणि त्यामागील व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

धमकीमागील हेतू काय

या घटनेनंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ही धमकी प्रत्यक्ष हल्ल्याच्या कटाचा भाग होती की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाईचा भडका! महागाई दर ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर; RBI च्या अंदाजापल्याड अन्नधान्याच्या दरांची झेप, पुढील महिन्यात व्याजदरातही वाढीचा अंदाज

सीसीटीव्हीतून चीनची ‘हेरगिरी’; सुरक्षा कॅमेऱ्यांमधूनच देशाच्या सुरक्षेला धोका, गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे

Mumbai : आंदोलकावरील गुन्हा रद्द! हायकोर्टाचा निर्णय, फौजदारी कारवाईचा वापर दुर्दैवी

Mumbai : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लाेकलमधून ढकलले; तरुणीने डावा हात गमावला, ५३ वर्षीय आरोपीला अटक