मुंबई

मुंबई जगातील २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत

भारतातील प्रमुख शहर मुंबईने जून महिन्यात बेर्ले नॉटिंघम डिझाइन स्टुडीओतर्फे जगभरातील १२५ शहरांमधून निवडलेल्या २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत १७वा क्रमांक पटकावला आहे.

Swapnil S

मुंबई : भारतातील प्रमुख शहर मुंबईने जून महिन्यात बेर्ले नॉटिंघम डिझाइन स्टुडीओतर्फे जगभरातील १२५ शहरांमधून निवडलेल्या २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत १७वा क्रमांक पटकावला आहे. निळे शहर म्हणून प्रसिद्ध जोधपूरने या यादीत ५वा क्रमांक मिळवला. इटलीमधील इंद्रधनुषी गाव बुरानो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

या यादीत हवाना (क्युबा), इस्तंबूल (तुर्की), कोपेनहेगन (डेन्मार्क), रिओ डी जानेरो (ब्राझील) आणि ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिना) ही इतर काही उल्लेखनीय शहरे होती. सॅनफ्रान्सिस्को (यूएसए) आणि हो ची मिन्ह (व्हिएतनाम) ही शहरे मुंबईच्या खालोखाल होती. हैदराबादही या यादीत सामील होते. परंतु त्यांना अव्वल २० शहरांमध्ये स्थान मिळवता आले नाही.

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार