Mumbai : रिक्षाचालकाने ४ वर्षांच्या मुलाला उचलून आपटले; CCTV व्हिडिओ व्हायरल 
मुंबई

Mumbai : रिक्षाचालकाने ४ वर्षांच्या मुलाला उचलून आपटले; CCTV व्हिडिओ व्हायरल

वसई पश्चिमेकडील एका सोसायटीत चार वर्षीय मुलावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Swapnil S

वसई : वसई पश्चिमेकडील एका सोसायटीत चार वर्षीय मुलावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर मीरारोड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संदीप पवार (५७) असे अटक आरोपीचे नाव आहे.

वसई पश्चिमेतील अनुप संकुल सोसायटीत अतुल कोंढारे कुटुंब राहते. कोंढारे आणि आरोपी संदीप पवार यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सोसायटीत अतुल कोंढारे यांचा मुलगा विघ्नेश इतर मुलांसोबत खेळत होता. याच वेळी आरोपी तेथे आला आणि इतर मुलांना हाकलून देत विघ्नेशला पकडले. त्यानंतर त्याचे डोके रिक्षावर आपटले तसेच त्याला उचलून जोरात खाली आपटत अमानुष मारहाण केली. मुलाची आजी सोडवण्यासाठी धावून आली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार