Mumbai : वांद्रे येथील फुटबॉल मैदानाबाबत याचिकेवर आज सुनावणी 
मुंबई

Mumbai : वांद्रे येथील फुटबॉल मैदानाबाबत याचिकेवर आज सुनावणी

वांद्रे रेक्लमेशन येथील प्रसिद्ध नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रुपांतर करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे रेक्लमेशन येथील प्रसिद्ध नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रुपांतर करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. असोसिएशनच्या याचिकेवर गुरुवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे खंडपीठ तातडीने सुनावणी घेणार आहे. याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत मैदानावरील क्रीडा पायाभूत सुविधा हटवण्यास किंवा तिथे कोणत्याही बांधकामाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी. अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासन 'सुधारित विकास योजना २०३४' अंतर्गत फुटबॉल मैदानाचा वापर 'खेळाचे मैदान आणि खुली जागा' यावरून 'कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स/प्रदर्शनी केंद्र' असा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पालिकेच्या या कारस्थानाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील झाल अंध्यारुजिना यांनी बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली आणि तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. महापालिकेने घाईघाईने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप असोसिएशनतर्फे करण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी तातडीने गुरुवारी घेण्याचे निश्चित केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

FDA ची नजर आता शाळा-कॉलेजच्या कॅंटिनकडे; लवकरच दिसतील परिणाम, तुकाराम मुंढेंचे संकेत

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी