मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प

पर्यावरण संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मलजल पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रात ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे तृतीय स्तरावरील संस्कारण व उदंचन केंद्र उभारण्याच्या सुमारे १,८२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यावरण संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मलजल पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रात ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे तृतीय स्तरावरील संस्कारण व उदंचन केंद्र उभारण्याच्या सुमारे १,८२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेवर बोट ठेवत काँग्रेसचे पालिकेतील गटनेते आश्रफ आजमी यांनी थर्ड पार्टी ऑडिटची केली आहे.

मलजल पुनर्प्रक्रिया प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने शहरातील समुद्रात सोडल्या जाणाऱ्या मलजलावर अत्याधुनिक द्वितीय आणि तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेतून तयार होणारे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणून त्यावर अंतिम शुद्धीकरण केले जाईल. त्यानंतर हे पाणी मुंबईकरांच्या पिण्यासाठीच्या जलपुरवठ्यात वापरण्याची योजना आहे.

सात केंद्रात पुनर्प्रक्रियेचे पाणी उपलब्ध होणार

सध्या वरळी, वांद्रे, घाटकोपर, धारावी, मालाड, वर्सोवा आणि भांडुप या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी सुरू असून ती टप्प्याटप्प्याने २०२८ पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. ही केंद्रे सुरू झाल्यानंतर दररोज १,२३२ दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार असून उर्वरित पाण्यावर दुय्यम प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाणार आहे.

जलबोगदा, उदंचन केंद्र उभारणार

धारावी, घाटकोपर आणि भांडुप या मलजल प्रक्रिया केंद्रांना भांडुप जलशुद्धीकरण केंद्राशी जोडण्यासाठी १,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा भूमिगत जलबोगदा उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. मात्र, भांडुप मलजल प्रक्रिया केंद्रातील बोगद्याची पातळी जलशुद्धीकरण केंद्राच्या बोगद्यापेक्षा कमी असल्याने प्रक्रिया केलेले पाणी पुढे नेण्यासाठी आवश्यक दाब निर्माण करणारे तृतीय स्तरावरील उदंचन केंद्र उभारावे लागणार आहे. याची क्षमता १,००० एमएलडीपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे.

म्हाडाला सदनिकेची किंमत वाढवण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

'एसआयआर'खाली सहा कोटी मतदार 'कटाप'

Mumbai : जेजे, माया ब्लड सेंटरचा रक्तपेढी परवाना रद्द; नियमांचे उल्लंघन केल्याने FDA ने केली कारवाई

पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार; 'सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला'

राज्यात पावसाची तूर्त विश्रांती; जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज