मुंबई

'स्टिंग रे', 'ब्ल्यू जेलीफिश'चा मुंबईच्या किनाऱ्यांवर वावर; नागरिकांना सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबईच्या किनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातीच्या माशांचे वावर असल्याचे आढळले आहे. या माशांच्या दंशामुळे इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या किनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातीच्या माशांचे वावर असल्याचे आढळले आहे. या माशांच्या दंशामुळे इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनादरम्यान 'ब्ल्यू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेने केलेल्या मार्गदर्शक सूचना

  • गणेश विसर्जन हे पालिकेने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.

  • गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.

  • पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

  • गणेश भक्तांनी चौपाटीवर नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करण्यात यावा.

  • गणेशमूर्ती विसर्जनास्थळी ठिकाणच्या मत्स्यदंशाच्या अनुषांगिक आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध असेल.

  • लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ न देण्याची खबरदारी घ्यावी.

मत्स्यदंश व प्रथमोपचार

  • मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय १०८ रुग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.

  • 'स्टिंग रे'ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

  • 'जेलीफिश'चा दंश झाल्यास नागरिकांनी नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.

  • जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.

  • जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

  • मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी