Mumbai : 'बेस्ट'ला उतरती कळा; प्रवाशांची संख्या, उत्पन्नात १० वर्षांत झाली घट; बसेसचा ताफाही ४ हजारांवरून २७८७ वर 
मुंबई

Mumbai : 'बेस्ट'ला उतरती कळा; प्रवाशांची संख्या, उत्पन्नात १० वर्षांत झाली घट; बसेसचा ताफाही ४ हजारांवरून २७८७ वर

मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाला गेल्या १० वर्षांत उतरती कळा लागल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. बेस्टच्या ताफ्यात १० वर्षांपूर्वी स्वमालकीच्या जवळपास चार हजार बसेस होत्या. मात्र २०२५-२६ मध्ये बेस्टकडे आता एकूण २७८७ बसेस असून स्वमालकीच्या फक्त २४९ बसेस शिल्लक आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ आता भाडेतत्त्वावरील बसेसवर अवलंबून आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाला गेल्या १० वर्षांत उतरती कळा लागल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. बेस्टच्या ताफ्यात १० वर्षांपूर्वी स्वमालकीच्या जवळपास चार हजार बसेस होत्या. मात्र २०२५-२६ मध्ये बेस्टकडे आता एकूण २७८७ बसेस असून स्वमालकीच्या फक्त २४९ बसेस शिल्लक आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ आता भाडेतत्त्वावरील बसेसवर अवलंबून आहे.

सन २०१५-१६ मध्ये बेस्टच्या ताफ्यात ३,९६३ बसेस होत्या. त्यावेळी भाडेतत्त्वावरील बस ही संकल्पनाच बेस्ट उपक्रमात नव्हती. २०१५-१६ मध्ये प्रत्येक बसमागे सरासरी ८३७ प्रवासी प्रवास करत होते, तर प्रति बस रोजचे उत्पन्न १०,७५३ रुपये होते. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ताफा ३,७४९ बसेसवर आला, तर प्रति बस प्रवासी संख्या ८६७ इतकी होती. मात्र उत्पन्न घटून १०,०१२ रुपयांवर आले आहे.

आता दहा वर्षांनंतर २०२५ - २६ मध्ये चित्र पूर्णपणे बदलले आहे. ‘बेस्ट’कडे केवळ स्वमालकीच्या २४९ बसेस असून २,५१८ भाडेतत्त्वावरील बसेससह एकूण ताफा २,७८७ बसेसवर आला आहे. २०२५ - २६ मध्ये प्रति बस प्रवासी संख्या ७५७ वर आली असून प्रति बस उत्पन्नही ९,३६३ रुपयांपर्यंत खाली आले आहे.तज्ज्ञांच्या मते, वाढती वाहतूक कोंडी, मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतूक पर्यायांची उपलब्धता, मार्गांमध्ये झालेले बदल तसेच स्वमालकीच्या बसेसची झालेली घट यामुळे बेस्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग