Mumbai : जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील बस बंद; गिरगाव, काळबादेवीवासीयांची गैरसोय प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील बस बंद; गिरगाव, काळबादेवीवासीयांची गैरसोय

दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्टच्या ६६, ६९, ८६, ८८ आणि १२६ क्रमांकाच्या बससेवा पूर्वीप्रमाणे जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्टच्या ६६, ६९, ८६, ८८ आणि १२६ क्रमांकाच्या बससेवा पूर्वीप्रमाणे जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.

बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात नाईक यांनी नमूद केले आहे की, गिरगाव आणि काळबादेवी येथील मेट्रो स्थानकांच्या उभारणीसाठी जगन्नाथ शंकरशेट मार्गाचे खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल-मे २०१७ पासून ६६, ६९, ८६, ८८ आणि १२६ या बसमार्गांमध्ये बदल करून त्या महर्षी कर्वे मार्गावरून दक्षिण मुंबईकडे वळविण्यात आल्या होत्या. दरम्यान, गेल्या वर्षी गिरगाव आणि काळबादेवी ही दोन्ही मेट्रो स्थानके नागरिकांसाठी खुली झाली असली, तरी रस्त्याची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे बसमार्ग पूर्ववत करण्यात आले नव्हते. आता जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील रस्त्याची सर्व कामे पूर्ण झाली असून बससेवा पूर्ववत करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

रहिवाशांना सव्वा किलोमीटर पायपीट

गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ गिरगाव परिसरातील नागरिकांना या बससेवांचा लाभ घेण्यासाठी महर्षी कर्वे मार्गावरील बसथांब्यापर्यंत सुमारे एक ते सव्वा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नाईक यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यामुळे संबंधित सर्व बसमार्ग पूर्वीप्रमाणे जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून दक्षिण मुंबईकडे तातडीने सुरू करून गिरगावकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल