Mumbai : १० हजार गाड्यांचे लक्ष्य; बेस्टचा १०,०८० कोटींचा अर्थसंकल्प सादर, उत्पन्नवाढीचा संकल्प  
मुंबई

Mumbai : १० हजार गाड्यांचे लक्ष्य; बेस्टचा १०,०८० कोटींचा अर्थसंकल्प सादर, उत्पन्नवाढीचा संकल्प

आर्थिक संकट, वाढता तोटा व बसगाड्यांची घटती संख्या अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने २०२७-२८ साठी १० हजार ८० कोटी ४९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक संकट, वाढता तोटा व बसगाड्यांची घटती संख्या अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने २०२७-२८ साठी १० हजार ८० कोटी ४९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. उत्पन्नवाढ, खर्चावर नियंत्रण आणि बससेवांचा विस्तार अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांना दर्जेदार सार्वजनिक परिवहन सेवा देण्याबरोबरच उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांनी गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे २०२७-२८ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. बेस्टचे प्रत्यक्ष उत्पन्न २०२५-२६ मध्ये ५,६८९.३४ कोटी रुपये होते. २०२६-२७ च्या सुधारित अंदाजात ते ६,७२३.०१ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. तर २०२७-२८ मध्ये उत्पन्नाचा आकडा ८,५६५.२० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. म्हणजेच एका वर्षात उत्पन्नात मोठी वाढ करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

२०० मिडी सीएनजी

मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन बेस्टने दीर्घकालीन नियोजनात १० हजार बसगाड्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. यामध्ये १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या आणि २०० मिडी सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे.

उत्पन्न वाढविणार!

जाहिराती, इमारती व जमिनींचे भाडे, मार्गाधिकार शुल्क तसेच अन्य व्यावसायिक उपक्रमांतून उत्पन्न मिळविण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर विद्युत आणि परिवहन विभागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ६४७.७९ कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे.

वीज विभाग नफ्यात

बेस्टच्या विद्युत विभागासाठी २०२७-२८ मध्ये ५,०१०.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, खर्च ४,८०५.८१ कोटी रुपये प्रस्तावित आहे. त्यामुळे या विभागातून २०४.५२ कोटी रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. दुसरीकडे, बस विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवासी संख्या वाढविणे आणि अन्य उत्पन्न स्रोत विकसित केले जात आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग