मुंबई : आकर्षक सजावट, उंच सुबक मूर्तींची एक झलक डोळ्यात साठवून घेण्यासाठी भक्तांची मोठी धावपळ सचरू असते. आकर्षण ठरते. त्यामुळे गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचे दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळते. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने गणेशोत्सवात १० विशेष मार्गांवर २६ अतिरिक्त बसेस प्रवाशांसाठी चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत या बसेस प्रवासी सेवेत असणार आहेत.
गणेशोत्सवात विविध मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी तसेच विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे या काळात सार्वजनिक वाहतुकीवर मोठा वाहतूक सुरळीत ठेवणे आणि भाविकांना सुरक्षित व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे, हा या विशेष सेवेचा उद्देश आहे. रात्रीच्या वेळेत खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. ‘बेस्ट’च्या या रात्रीच्या विशेष बससेवेमुळे गणेशभक्तांना दर्शन, मंडपभेटी आणि विसर्जनानंतर घरी परतणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच बस थांब्यांजवळ बस निरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
या मार्गावर धावणार बसेस!
परळ, लालबाग, गिरगांव, खेतवाडी आदी ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. १४ ते २४ सप्टेंबर दरम्यान उपक्रमातर्फे रात्री १०.३० ते सकाळी ६ दरम्यान एक मजली बस चालविण्यात येणार आहेत.
ए-४डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार, ए-८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिवाजी नगर टर्मिनस, ए-२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते देवनार आगारए-२५ बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (शीव),ए-४२कमला नेहरू उदयान ते महाराणा प्रताप चौक (माझगांव), ए - ४४ वरळी आगार ते श्रावण यशवंते चौक (काळाचौकी), बसमार्ग ५१ ईलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार, बसमार्ग ६४ दादर रेल्वे स्थानक (पूर्व) ते श्रावण यशवंते चौक (काळाचौकी),बसमार्ग ६६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शीव),बसमार्ग ६९ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझीयम) ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) या मार्गावर रात्रीच्या वेळी २६ जादा बस चालविण्यात येणार आहे.