मुंबई

Bhandup BEST Bus Accident: पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले; आरोपी बस चालकाचा न्यायालयात दावा

भांडुप येथे बस अपघातात चार जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बेस्ट बस चालक संतोष सावंत यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

Swapnil S

चारुल शाह जोशी / मुंबई : भांडुप येथे बस अपघातात चार जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बेस्ट बस चालक संतोष सावंत यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. पादचारी आणि ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संतोष सावंत यांचे वकील देवेंद्र पाटील यांनी बुधवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करताना सांगितले की, अपघात ज्या ठिकाणी झाला तो रस्ता अरुंद होता, तेथे मोठी गर्दी होती आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले होते. वळण घेत असताना अचानक समोर एक ऑटो रिक्षा आणि एक पादचारी आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, असा युक्तिवाद करण्यात आला.

कोणत्याही नशेत नव्हतो, जामिन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी

अपघाताच्या वेळी आपण कोणत्याही नशेत नव्हतो आणि ही घटना केवळ अपघातच होती, असा दावाही सावंत यांनी केला आहे. या जामिन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असून, न्यायालयाने सरकारी पक्षाला आपले उत्तर देण्यास सांगितले आहे.

भांडुप पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणानुसार, २९ डिसेंबर रोजी सावंत हे बेस्टची ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची नऊ मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस (मार्ग क्रमांक ६०६) चालवत होते. ही बस भांडुप (पश्चिम) उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ पादचाऱ्यांवर आदळली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले, असा आरोप आहे.

OTP द्या, पाणी घ्या! टँकर बुकिंगसाठी BMC ची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात; अनधिकृत पाणीउपसाला बसणार लगाम

Thane : खारेगावमध्ये महापालिकेची पहिली मोफत CBSE शाळा सुरू; पहिल्याच दिवशी १७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश

Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

वाढत्या पाणीटंचाईत आजपासूनच करा 'या' गोष्टी; होईल पाण्याची बचत