Mumbai : बीकेसीतील झाडांच्या मुळाभोवती ‘स्मार्ट कवच’; झाडांच्या मुळाचे संरक्षण प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बीकेसीतील झाडांच्या मुळाभोवती ‘स्मार्ट कवच’; झाडांच्या मुळाचे संरक्षण

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची निगा राखणे काळाची गरज बनली आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमांतर्गत आता झाडांचे संवर्धन करण्यासाठी झाडांच्या मुळाभोवती 'लोखंडी ग्रिल्स' बसवण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची निगा राखणे काळाची गरज बनली आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमांतर्गत आता झाडांचे संवर्धन करण्यासाठी झाडांच्या मुळाभोवती 'लोखंडी ग्रिल्स' बसवण्यात येत आहे. वांद्रे कुर्ला संकुलात झाडांच्या मुळाभोवती स्मार्ट कवच बसवण्यात आले असून या ठिकाणचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत अन्य ठिकाणी अशाच प्रकारे झाडांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

पादचारी मार्गावर असलेल्या झाडांच्या मुळाजवळ कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास फेकल्या जातात. यामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे झाडांची मुळे संरक्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्यापैकी एक म्हणजे झाडांच्या मुळाभोवती लोखंडी ग्रील बसवण्यात येत आहेत. ग्रील बसवल्याने झाडांच्या मुळांभोवती जागा संरक्षण केली जाईल आणि झाडाच्या मुळांना हवा पाणी योग्यरीत्या मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर बीकेसी परिसरात या ग्रिल्स बसवण्यात आल्या आहेत.

समतोल साधण्याचा प्रयत्न

नवीन उपक्रमामुळे पावसाचे पाणी सहज मुळांपर्यंत पोहोचते झाडांच्या वाढीसही मदत होते. पर्यावरण संरक्षण आणि शहरी सुशोभीकरण यांचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण