Mumbai : धरणांच्या नदीपात्रात गढूळ पाणी; पाणी गाळून, उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन  
मुंबई

Mumbai : धरणांच्या नदीपात्रात गढूळ पाणी; पाणी गाळून, उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. यामुळे नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्‍यावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे.

मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत.

पाण्‍यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरिनचा पुरेसा वापर केला जात आहे. तरी नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्‍त झाल्‍यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

मेगा IPO येतोय...; दशकाची प्रतीक्षा अखेर संपली, NSE च्या ३० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर