Mumbai : डेब्रिज वाहतुकीचे नियम सामान्य डंपरवाल्यांनाच का? मेगा सिटी डेब्रिज ट्रक वेल्फेअर असोसिएशनचे पत्र 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : डेब्रिज वाहतुकीचे नियम सामान्य डंपरवाल्यांनाच का? मेगा सिटी डेब्रिज ट्रक वेल्फेअर असोसिएशनचे पत्र

मुंबई महानगरपालिकेने डेब्रिज आणि माती वाहतुकीसाठी कडक नियम लागू केले असले, तरी या नियमांचा सर्वाधिक फटका सामान्य डंपर मालक आणि वाहतूकदारांना बसत असल्याचा आरोप मेगा सिटी डेब्रिज ट्रक वेल्फेअर असोसिएशनने केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने डेब्रिज आणि माती वाहतुकीसाठी कडक नियम लागू केले असले, तरी या नियमांचा सर्वाधिक फटका सामान्य डंपर मालक आणि वाहतूकदारांना बसत असल्याचा आरोप मेगा सिटी डेब्रिज ट्रक वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. सामान्य डंपर चालकांवर कारवाई करताना मोठ्या बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांना अभय का, असा सवाल उपस्थित करत असोसिएशनने जी-साऊथ (वरळी) विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे.

महापालिकेने डेब्रिज वाहतूक करणाऱ्या डंपरसाठी नव्या कार्यपद्धतीनुसार जीपीएस ट्रॅकिंग बंधनकारक केले आहे. या नियमांमुळे सामान्य डंपर मालक आणि वाहतूकदारांवर अनेक निर्बंध आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने या व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

प्रशासनाची दुटप्पी भूमिका

मुंबईतील मोठ्या बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. या कामांतून दररोज हजारो ब्रास माती, मुरुम, दगड आणि डेब्रिज बाहेर काढून डंपरद्वारे वाहून नेले जाते. मात्र, या मोठ्या प्रकल्पांमधील खोदकाम आणि डेब्रिज वाहतुकीची तितक्याच गांभीर्याने तपासणी होत नसल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. सामान्य डंपर मालकांवर नियमांचा बडगा उगारला जात असताना मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही दुहेरी भूमिका असल्याची टीका निवेदनातून करण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची घेणार भेट

सीमांकन विधेयकासाठी बहुमताच्या शोधात - काँग्रेस