Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त 
मुंबई

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

प्रभादेवी येथील रुस्तमजी क्राऊन या आलिशान निवासी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महानगरपालिकेची सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू होती.

Swapnil S

मुंबई : प्रभादेवी येथील रुस्तमजी क्राऊन या आलिशान निवासी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महानगरपालिकेची सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू होती. मंगळवारी सहा मजल्यांवरील सहा फ्लॅटमध्ये हातोडा चालवण्यात आला. तर चार फ्लॅटधारकांनी स्वतःहून घरातील अननियमित बांधकाम जमीनदोस्त केले.

प्रभादेवीतील गोखले रोड साऊथ परिसरात असलेल्या रुस्तमजी क्राऊनच्या ‘ए’ आणि ‘बी’ या दोन निवासी विंगमध्ये ३०० हून अधिक फ्लॅट आहेत. त्यापैकी १३८ फ्लॅटमध्ये अनियमित बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले होते.

मंगळवारी कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेला पोलिस बंदोबस्ताची मदत घ्यावी लागली. या प्रकल्पात शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही मंत्री आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींचे फ्लॅट असल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

तक्रारीनुसार, काही फ्लॅटधारकांनी कॉमन लॉबी आणि पॅसेजच्या जागेवर अतिक्रमण करून सुमारे ४५० ते ५०० चौरस फूट अतिरिक्त क्षेत्र आपल्या फ्लॅटमध्ये समाविष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त