Mumbai : दिवे गायब, तरी कंत्राटदाराला पैसे; नगरसेवकांकडून चौकशीची मागणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : दिवे गायब, तरी कंत्राटदाराला पैसे; नगरसेवकांकडून चौकशीची मागणी

देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी मोबाईल हायमास्ट दिवे पुरविण्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी हायमास्ट दिवे लावलेली वाहने दिसत नसतानाही कंत्राटदाराला पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे.

Swapnil S

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी मोबाईल हायमास्ट दिवे पुरविण्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी हायमास्ट दिवे लावलेली वाहने दिसत नसतानाही कंत्राटदाराला पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत हायमास्ट दिव्यांवर १२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्यानंतरही आता पुढील ४०० दिवसांसाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा नवा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. या खर्चाच्या पारदर्शकतेवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली.

दिवे दिसत नाहीत, मग पैसे कशाच्या आधारे ?

स्थायी समितीतील चर्चेदरम्यान जमीर कुरेशी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. गेल्या तीन वर्षांपासून देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोबाईल हायमास्ट दिव्यांची वाहने दिसत नसतील, तर कंत्राटदाराला नेमके कोणत्या आधारावर पैसे दिले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या दहा वर्षांत या सुविधेवर १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला असताना पुन्हा नव्याने कोट्यवधींचा प्रस्ताव आणण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची घेणार भेट

सीमांकन विधेयकासाठी बहुमताच्या शोधात - काँग्रेस