Mumabi : रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव अद्याप कागदावरच; राज्य शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumabi : रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव अद्याप कागदावरच; राज्य शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरील मनोरंजन करात मोठी वाढ करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव सध्या राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सुधारित दरांना मंजुरी मिळून त्याबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत सध्याचेच कराचे दर लागू राहणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरील मनोरंजन करात मोठी वाढ करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव सध्या राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सुधारित दरांना मंजुरी मिळून त्याबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत सध्याचेच कराचे दर लागू राहणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित करवाढीमुळे तिकीट दरांवर तत्काळ कोणताही परिणाम होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेने २०२७-२८ या आर्थिक वर्षासाठी मनोरंजन कराचे सुधारित दर प्रस्तावित केले आहेत. मात्र हे दर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजूर होऊन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच लागू होणार आहेत. त्यानंतरही या दरांना विधी समिती, स्थायी समिती व पालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक राहणार आहे.

प्रस्तावित सुधारणेनुसार एसी मल्टिप्लेक्समधील कर सध्याच्या ६० रुपयांवरून ४०० रुपये प्रति शो करण्याचा प्रस्ताव आहे. एकल एसी चित्रपटगृहांसाठी २०० रुपये, तर विनाएसी चित्रपटगृहांसाठी ९० रुपये प्रति शो कर प्रस्तावित आहे. नाटक आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी १०० रुपये प्रति शो कर आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र या प्रस्तावित दरांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

सध्या एसी चित्रपटगृहांसाठी ६० रुपये, विना-एसी चित्रपटगृहांसाठी ४५ रुपये, तर नाटक आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी २५ रुपये प्रति शो मनोरंजन कर आकारला जात आहे. सर्कस आणि मनोरंजन मेळ्यांसाठी ५० रुपये प्रतिदिन कर लागू आहे. कर वाढीचा प्रस्ताव विधी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. समिती सदस्य समृद्धी काते यांनी प्रस्तावावर आक्षेप घेत या महागाईत करवाढ केली, तर मुंबईकर त्याकडे पाठ फिरवतील, असे म्हणाल्या.

सध्याचा कर - प्रस्तावित कर

एसी चित्रपटगृह /मल्टिप्लेक्स : ६० रुपये - ४०० रुपये

विना -एसी चित्रपटगृह : ४५ रुपये - २०० रुपये

व्यावसायिक नाटके, कॉन्सर्ट, मेळे : २५ रुपये - १०० रुपये

इतर मनोरंजन कार्यक्रम : ३० रुपये - ७५ रुपये

सर्कस / कार्निव्हल : ५० रुपये - १०० रुपये

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी