संग्रहित छायाचित्र  एक्स @MASTinsan
मुंबई

कबुतरांना खाद्य पुरविण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती; सूचना २९ ऑगस्टपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे किंवा कसे, यासाठी प्राप्त अर्जाबाबत नागरिकांना हरकती/सूचना नोंदविण्याचे आवाहन केले आहे. या सूचना व हरकती सोमवार १८ ऑगस्ट ते शुक्रवार २९ ऑगस्ट दरम्यान नोंदविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे किंवा कसे, यासाठी प्राप्त अर्जाबाबत नागरिकांना हरकती/सूचना नोंदविण्याचे आवाहन केले आहे. या सूचना व हरकती सोमवार १८ ऑगस्ट ते शुक्रवार २९ ऑगस्ट दरम्यान नोंदविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दादरसह इतर कबुतरखान्यांमधील कबुतरांना खाद्य पुरविण्यास बंदी घातली आहे. यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे कबुतरखाना परिसरात राहणाऱ्या स्थानिकांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील कबुतरखान्यांबाबत मुंबई दादर महानगरपालिकेला कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि पल्लवी पाटील, ॲनिमल अँड बर्डस् राईट्स ॲक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.

हे मुंबई तिन्ही महानगरपालिकेच्या सकतस्थळावरील https://portal.mcgm.gov.i n/irj/portal/anonymous? guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत.

संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जाचे अवलोकन करून कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठरावीक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत हरकती, सूचना suggestions@mcgm.gov.i n या ईमेल आयडीवर १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कबुतरांना खाद्य घालण्यास केलेल्या विरोधावरून जैन समाज आक्रमक झाला आहे.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद