Mumbai : सात दिवसांत कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम भरा; अन्यथा जप्त मालमत्तांचा लिलाव- पालिकेचा इशारा  
मुंबई

Mumbai : सात दिवसांत कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम भरा; अन्यथा जप्त मालमत्तांचा लिलाव- पालिकेचा इशारा

थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महालक्ष्मी, लोअर परळ आणि मालाड येथील कंपन्यांनी थकीत रक्कम सात दिवसांत न भरल्यास जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महालक्ष्मी, लोअर परळ आणि मालाड येथील कंपन्यांनी थकीत रक्कम सात दिवसांत न भरल्यास जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने दिला आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम २०६ (२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत लोअर परळ, महालक्ष्मी आणि मालाड (पूर्व) येथील व्यावसायिक, निवासी आणि मिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी महालक्ष्मी येथील रघुवंशी मिल्स लिमिटेड या मालमत्तेवर असून सुमारे ३७.३२ कोटी रुपयांची देय रक्कम आहे. त्यापैकी २७.७१ कोटी रुपये मालमत्ता कर तर ९.६० कोटी रुपये दंडाचा समावेश आहे.

लोअर परळ येथील अंबिका सिल्क मिल्स कंपनी लिमिटेड या मालमत्तेवर सुमारे ११.२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ६.०७ कोटी रुपये कर आणि ५.१४ कोटी रुपये दंडाचा समावेश आहे.

मालाडच्या वाडार एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित दोन मालमत्तांवर अनुक्रमे १.०८ कोटी रुपये आणि १.२८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO