Mumbai : पालिकेची बेस्टला ५०० कोटींची मदत; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला बेस्ट दिलासा 
मुंबई

Mumbai : पालिकेची बेस्टला ५०० कोटींची मदत; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला बेस्ट दिलासा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी गोष्टींची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी गोष्टींची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाला देण्यासाठी १ हजार कोटींची तरतूद केली असून त्यापैकी ५०० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला वळते करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यास सुरुवात केल्याचे बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले.

मुंबई महापालिका, टाटा पावर, राज्य सरकार, बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीसह अन्य देणी याची थकबाकीची रक्कम ३ हजार कोटी आहे. बेस्टच्या तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याने बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देणी देण्यात अडचणी येत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ग्रॅच्युइटीसाठी ७०० कोटींची गरज

४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीसाठीचे पैसे देण्यासाठी ७०० कोटींची गरज भासणार आहे. त्यापैकी ५०० कोटी रुपये बेस्टला मिळणार आहेत. आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या, आर्थिक कोंडीत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला रोज नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे.

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक