संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपकडून गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, मकरंद नार्वेकर या ज्येष्ठ नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपकडून गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, मकरंद नार्वेकर या ज्येष्ठ नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. स्थायी, सुधार, शिक्षण व बेस्ट समिती सदस्यांच्या नावाची घोषणा सोमवारी पालिका सभागृहात करण्यात आली आहे. तर चार वैधानिक समिती अध्यक्षपदाची निवडणूक २० आणि २३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी १८ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती या वैधानिक समित्यांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातही श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेली स्थायी समिती कोणाकडे जाणार आणि त्यावर अध्यक्ष कोण असणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (शिंदे) अमेय घोले यांच्या नावाची तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (शिंदे) तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची त्याचप्रमाणे शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून राजेश्री शिरवाडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे.

स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांची नावे

भाजप (८) : गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, रमाकांत नार्वेकर, हरीश भांदिर्गे, शिवकुमार झा, प्रकाश दरेकर, तेजेंद्र तिवाना.

शिवसेना ठाकरे (७) : श्रद्धा जाधव, यशोधर फणसे, रामकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर, टी. जगदीश, लक्ष्मी भाटिया.

शिवसेना शिंदे (४) : अमेय घोले, यामिनी जाधव, अंजली नाईक, सईदा खान

काँग्रेस (३) : अश्रफ आजमी, अजंता यादव, तुलिप मिरांडा.

एमआयएम (१) : मोहम्मद कुरेशी

मनसे (१) : यशवंत किल्लेदार.

किशोरी पेडणेकरांना कुठल्याच समितीत स्थान नाही

मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे सेनेच्या नगरसेविका व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची वर्णी लागली आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपद वगळता त्यांना कुठल्याच समितीत स्थान देण्यात आलेले नाही. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान नाही. विरोधी पक्षनेता परंपरेनुसार स्थायी समितीचा सदस्य असतोच. मात्र, स्थायी समितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना संधी देण्यात आली आहे. तर स्थायी समितीनंतर महत्त्वाची समिती असलेल्या सुधार समितीत माजी महापौर विशाखा राऊत आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांना संधी देण्यात आली आहे.

आजचे राशिभविष्य, २२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

एक ना धड भाराभर चिंध्या!

देवेंद्रजींचे ध्यासपर्व!

Ashadhi Ekadashi 2026: उपवासात झटपट बनवा चविष्ट बटाट्याची उसळ; फक्त १० मिनिटांत होईल तयार

रेल्वे स्टेशनच्या नावातील 'टर्मिनस', 'जंक्शन' आणि 'कॅन्ट'चा अर्थ काय? ९०% लोकांना माहिती नाही!