Mumbai : सभागृहातील आवाज होणार खणखणीत; ध्वनियंत्रणा बदलणार, माइक उचलाउचली बंद संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सभागृहातील आवाज होणार खणखणीत; ध्वनियंत्रणा बदलणार, माइक उचलाउचली बंद

मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहातील आवाज खणखणीत होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहातील आवाज खणखणीत होणार आहे. सभागृहातील ध्वनियंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या टेबलावर स्वतंत्र वायरलेस माइक बसविण्यात येणार असून, यासाठी सुमारे १ कोटी १४ लाख ८७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत ही नवी व्यवस्था कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहात सन २००२ मधील आगीनंतर नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी बसविण्यात आलेली ध्वनी व्यवस्था कालबाह्य झाल्याने ती बदलण्याची गरज निर्माण झाली होती. फेब्रुवारी २०२६ मध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात बोलताना आवाज स्पष्टपणे पोहोचत नसल्याची तक्रार केल्यानंतर सभागृह नेते गणेश खणकर यांनी ध्वनी व्यवस्था बदलण्यासाठी पाठपुरावा केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार