मुंबई

Mumbai : खटल्यातील निकाल बाजूने लावण्यासाठी लाच मागितली; २५ लाखांची रक्कम घेताना दुभाषिकाला अटक

या कारवाईमुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : हॉटेल मालकी हक्काबाबत दाखल असलेल्या खटल्यातील निकाल बाजूने लावण्याचे आश्वासन देत लाचेची मागणी करून २५ लाख रुपयांची लाच घेताना धोबीतलाव येथील लघुवाद न्यायालयाचे अनुवादक दुभाषिक विशाल चंद्रकांत सावंत यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागने अटक केली. या कारवाईमुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

वयोवृद्ध तक्रारदारांनी लघुवाद न्यायालयात त्यांच्या हॉटेल मालकी हक्काबाबत याचिका दाखल केली होती. खटल्याची सुनावणी अंतिम टप्यात असून लवकरच खटल्याचा निकाल अपेक्षित होता. याच दरम्यान न्यायालयात अनुवादक दुभाषिक सावंत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या बाजूने निकाल लावून देतो असे त्यांना सांगितले. त्यासाठी सावंत यांनी वृद्धाकडे २५ लाख रुपयांच्या लाच मागितली. ही रक्कम दिल्यास निकाल तुमच्या बाजूला लागला असे समजा, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

सावंत यांनी तक्रारदाराकडून २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उघडकीस आले. अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी चंद्रकांत यांना हॉटेलमध्ये लाच घेण्यासाठी बोलाविले. सोमवारी सावंत हॉटेलमध्ये आले. यावेळी तक्रारदाराकडून २५ लाखांची लाच घेताना सावंत यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी