मुंबई

उड्डाणपूल खुले करण्याच्या कालमर्यादा निश्चित; बेलासिस पूल ३० नोव्हेंबर, कर्नाक पूल १० जून, सायन उड्डाणपूल मे २०२६

पावसाळ्यापूर्वी पुलाच्या कामांना गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा. तसेच दिलेल्या मुदतीत पुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

Swapnil S

मुंबई - पावसाळ्यापूर्वी पुलाच्या कामांना गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा. तसेच दिलेल्या मुदतीत पुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. बेलासिस पूल ३० नोव्हेंबर, कर्नाक पूल १० जून २०२५ आणि सायन उड्डाणपूल येत्या ३१ मे २०२६पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्याच्या कालमर्यादा बांगर यांनी दिल्या.

पालिकेच्या वतीने रेल्वे मार्गांवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात प्रामुख्याने बेलासिस, कर्नाक आणि शीव उड्डाणपुलांचा समावेश आहे. या पुलांच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. बेलासिस पुलाचे काम पूर्णत्वा‍चा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश देत अभिजीत बांगर यांनी दिले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

ठाण्यात शिंदेंना घेरण्याची रणनीती! उद्धव-राज ठाकरे गट सक्रिय

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

मुंबईकरांचा दिवाळी खरेदी उत्सव! रविवारी साधली दिवाळीपूर्व खरेदी; बाजारपेठाही गजबजल्या