मुंबई

...तर थेट कारवाई! कामाबाबत तडजोड नाही, अधिकाऱ्यांची झाडाझडती

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते कामात गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सरप्राइज व्हिजिट करावी. रस्ते कामांत दिरंगाई त्रुटी आढळल्यास थेट दंडात्मक कारवाईसह कठोर कारवाई करावी, असे सक्त आदेश पालिका प्रशासनाने रस्ते विभागाला दिले आहेत.

१७ ते २३ एप्रिल या ७ दिवसांच्या कालावधीत २ हजार ६५० रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी ३७८ रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांमधून पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटचा पुरवठा झाला आहे. यानुसार तब्बल १८ हजार ५६० घनमीटर सिमेंट काँक्रीट वापरून रस्ते काँक्रीटकरण पूर्णत्वाकडे पोहोचले आहेत.

खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे ध्येय ठेवून, सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. काँक्रीट रस्ते डांबराच्या रस्त्यांपेक्षा अधिक काळ टिकतात. ते अवजड वाहतुकीला आणि हवामानातील बदलांना जास्त चांगले तोंड देतात. एकदा का काँक्रीट रस्ता तयार झाला, तर त्याची देखभाल दुरुस्ती करायचा खर्च फार कमी असतो आणि वेळोवेळी दुरुस्तीची गरजही कमी भासते. मुंबईतील भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रीटचे रस्ते हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे. यंदा अधिकाधिक रस्ते सिमेंट काँक्रीटने मजबूत करण्याचे लक्ष्य असून रस्ते व वाहतूक विभागाचे अधिकारी अविरत कार्यरत आहेत. सर्वच रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सुरू असलेली काँक्रीटकरणाची कामे करून वाहतूककोंडी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सिमेंट काँक्रिट रस्ते अधिक टिकाऊ आणि खड्डेमुक्त असल्याने मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अनुभवता येईल.

वेळेची बचत गुणवत्तेवर नियंत्रण

रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर वाहन हे एक विशेष प्रकारचे वाहन आहे, ज्यामध्ये फिरणाऱ्या ड्रममध्ये तयार केलेले सिमेंट काँक्रीट भरलेले असते. हे वाहन आरएमसी प्रकल्पावरून बांधकाम स्थळी काँक्रीट पोहोचवते. ड्रम सतत फिरत असल्यामुळे काँक्रीट घट्ट न होता त्याचे मिश्रण एकसंध राहते. या ट्रकच्या वापरामुळे वेळेची बचत होते आणि काँक्रीटच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येते.

३१ मेपर्यंत कामे फत्ते करा

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत मुंबईतील काम सुरू असलेल्या अधिकाधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. काँक्रीट कामाचा दर्जा अत्युच्च असावा याकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासण्या केल्या जात आहेत.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता