Mumbai : अनधिकृत बांधकामांवर आता AI ची नजर; तिवाना यांची ठरावाची सूचना सभागृहात मंजूर  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर आता AI ची नजर; तिवाना यांची ठरावाची सूचना सभागृहात मंजूर

मुंबईत बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बेकायदा बांधकामे अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी आता ‘एआय’ची नजर असणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बेकायदा बांधकामे अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी आता ‘एआय’ची नजर असणार आहे. भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी सभागृहात मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर अधिक प्रभावी आणि वेगवान पद्धतीने कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे शहर नियोजन, सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आली. पारंपरिक तपासणी पद्धतीबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन सर्वेक्षण, उपग्रह छायाचित्रे, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), दूरसंवेदन तंत्रज्ञान आणि तत्काळ देखरेख व्यवस्था यांचा वापर करून नव्याने सुरू होणारी अनधिकृत बांधकामे, अतिरिक्त मजले तसेच बेकायदेशीर संरचनात्मक बदल प्रारंभीच ओळखण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

तसेच नागरिकांसाठी भौगोलिक स्थान नोंदविणारी भ्रमणध्वनी प्रणाली (मोबाईल ॲप) आणि ऑनलाइन तक्रार नोंदणी व्यवस्था सुरू करण्याची सूचना करण्यात आली. या माध्यमातून तक्रारींचे अचूक स्थान संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपलब्ध होऊन वेळेत कारवाई करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सभागृहाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अनधिकृत बांधकाम शोध प्रणाली विकसित करावी, नियमित ड्रोन व उपग्रह सर्वेक्षण करावे, नागरिकांसाठी तक्रार नोंदणी प्रणाली सुरू करावी तसेच निश्चित कालमर्यादेत कृती आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल सभागृहास सादर करावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यास मंजुरी दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया