३२० मीटर लांब सायकल ट्रॅक, पादचारी, पर्यटकांसाठी रस्ता ; कोस्टल रोड प्रकल्पात नव्याने समावेश; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता  
मुंबई

३२० मीटर लांब सायकल ट्रॅक, पादचारी, पर्यटकांसाठी रस्ता ; कोस्टल रोड प्रकल्पात नव्याने समावेश; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पात आता पादचारी व पर्यटकांसाठी पादचारी रस्ता अन् सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महापालिका ९ कोटी ६४ लाख १५ हजार रुपये मोजणार आहे. बुधवारी, ३ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पात आता पादचारी व पर्यटकांसाठी पादचारी रस्ता अन् सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महापालिका ९ कोटी ६४ लाख १५ हजार रुपये मोजणार आहे. बुधवारी, ३ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम हाती घेतले असून काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत असून तो तीन भागांमध्ये विभागला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा भाग १, २ व ४ या तीन भागांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. किनारी रस्ता प्रकल्पाच्या अंतर्गत पुनः प्रापण (रिक्लेमेशन) द्वारे नव्याने निर्माण करण्यात आलेला प्रामेनेड (विहारपथ) प्रियदर्शनी पार्क येथून सुरू होऊन नवीन किनाऱ्यालगत अखंडपणे लोटस जेट्टीपर्यंत जातो. परंतु लोटस जेट्टी येथे नेव्हिगेशन ब्रीजवरील किनारी रस्त्याच्या संरेखनामुळे प्रोमेनेड तेथेच समाप्त होतो.

प्रस्तावित मार्ग असा आहे

मूळ निविदा प्रस्तावातील निविदा आराखड्यांत सलग जोडणी रस्ता किंवा विहारपथ दर्शवण्यात आलेला नाही. म्हणूनच हे काम कार्यान्वित झालेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामधील विद्यमान कंत्राटदाराच्या कामात समाविष्ट नव्हते. परंतु आता वरळी येथील समुद्र महाल इमारत येथील प्रस्तावित पोलीस चौकी तसेच फायर ब्रिगेड इमारतीला डॉ. ॲनी बेझंट रोडवरून थेट जोडणी उपलब्ध करून देणे तसेच लोकांच्या व सायकलस्वारांची अखंडपणे ये-जा करण्यासाठी लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेसपर्यंत प्रोमोनेडची सलगता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी मे. स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रा. लि. यांची सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार मे. स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रा. लि. यांना कामाचे स्वीकृत पत्र जारी करण्यात आले असून लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत प्रस्तावित पादचारी विहारपथ/रस्त्याची जबाबदारी सल्लागारावर सोपवण्यात आली आहे.

असे होणार काम

वरळी येथील समुद्र महाल येथे प्रस्तावित पोलीस चौकी/फायर ब्रिगेड इमारत आपत्कालीन परिस्थितीत डॉ. ॲनी बेझंट रोड येथून जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नागरिकांना/ सायकलस्वारांना अखंडपणे ये-जा करण्याकरिता लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेसपर्यंत विहारपथ सलगता राखण्यासाठी ३२० मी. लांबीचा व जवळपास ८ मी. रुंदीचा नवीन विहारपथ रस्ता बांधकाम प्रस्तावित आहे.

उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले, मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू

Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर 

Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बाळ-माता सुरक्षित

भारत-पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यात ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

Thane : मृत्यूशी झुंजणाऱ्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाची थरारक बचाव मोहीम यशस्वी