मुंबई: कोस्टल रोड परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी सहा ठिकाणी शौचालय उभारण्यात आली आहेत. अत्याधुनिक शौचालय बांधण्यात येणार असून स्वच्छता, जिवाणू संवर्धनाची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. एका शौचालयाच्या देखभालीवर वर्षांला २.३२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मुंबईकरांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कोस्टल रोडलगत उभारण्यात आलेल्या अवघ्या सहा प्रगत मॉड्युलर जैव-शौचालय बांधण्यात आले आहे. कोस्टल रोडलगत नागरिकांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रगत मॉड्युलर जैव शौचालये बसविण्यात आली आहेत. मलनिःसारण वाहिन्या उपलब्ध नसलेल्या किंवा जागेच्या मयदिमुळे पारंपरिक स्वच्छतागृहे उभारणे शक्य नसलेल्या ठिकाणी ही शौचालये उपयुक्त ठरतात. मात्र, या शौचालयांच्या नियमित स्वच्छतेसह जैविक पाचक प्रणालीची देखभाल, जिवाणू संवर्धन आणि तांत्रिक तपासणी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटाची मुदत ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुढील एक वर्षासाठी या सहा जैव-शौचालयांचे संचालन आणि परिरक्षण करण्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी श्री इंटरनॅशनल आणि एस ग्रीन एन्व्हायरो या दोन कंपन्या पात्र ठरल्या, तर केमसोल ट्रेडर्स या कंपनीने पात्रता निकष पूर्ण न केल्याने तिची निविदा अपात्र ठरविण्यात आली.
प्रशासनाने श्री इंटरनॅशनल या कंत्राटदाराला २ कोटी २३ लाख ९२ हजार रुपये तसेच चार टक्के सादीलवार शुल्कापोटी ८ लाख ९५ हजार ६८० रुपये असे एकूण २ कोटी ३२ लाख ८७ हजार ६८० रुपयांचे कंत्राट देण्याची शिफारस केली आहे.
विशेष म्हणजे, या कंत्राटात केवळ शौचालयांची साफसफाई नव्हे, तर जैविक पाचक प्रणाली कार्यरत ठेवणे, आवश्यक जिवाणू संवर्धन करणे, नियमित तांत्रिक तपासणी करणे आणि नागरिकांना स्वच्छताविषयक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देणे अशा कामांचा समावेश आहे.
या ठिकाणी आहेत अत्याधुनिक शौचालय
वरळी डेअरीसमोर
महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस
हाजी अली जंक्शन
नॉर्थ बिंदू, ठाकरे चौक
अमरसन्स गार्डनजवळ
बिंदू माधव चौकाजवळ