Mumbai : दूषित पाण्याच्या तक्रारींवर २४ तास नजर; जल विभागाची SOP लागू  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : दूषित पाण्याच्या तक्रारींवर २४ तास नजर; जल विभागाची SOP लागू

मुंबईकरांना दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने आता चोवीस तास कार्यरत राहणारी नवी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांना दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने आता चोवीस तास कार्यरत राहणारी नवी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू केली आहे.

महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवाल २०२५-२६नुसार, मुंबईतील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण शहराच्या पातळीवर घटले आहे. २०२५-२६मध्ये दूषित नमुन्यांचे प्रमाण ०.२८ टक्के होते. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण प्रत्येकी ०.४६ टक्के होते. मात्र, काही भागांमध्ये दूषित पाण्याची समस्या उलट वाढल्याचे समोर आले आहे.

विशेषतः बी वॉर्डमधील डोंगरी आणि उमरखाडी परिसरात दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक ४.०३ टक्के नोंदवण्यात आले आहे.

तक्रार ते निवारण... एकत्रित यंत्रणा

तक्रार प्राप्त झाल्यापासून दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून दुरुस्ती करण्यापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्याची तरतूद या कार्यपद्धतीत करण्यात आली आहे.

गळती शोधक पथक

दूषित पाण्याचा स्रोत शोधून दुरुस्ती केल्यानंतर पाणी सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत संबंधित यंत्रणांना कार्यरत राहावे लागणार आहे. कनेक्शनमुळे दूषित पाणीपुरवठ्याचा धोका वाढतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका